STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

4  

Shital Yadav

Inspirational

अंधश्रद्धा निर्मूलन

अंधश्रद्धा निर्मूलन

1 min
28.8K


अंधश्रद्धा निर्मूलन

धागेदोरे,चमत्कार

बुवाबाजी मोहमाया

चिंधीलाही दावी साप


म्हणे करणीची छाया

फासे शेंदूर कपाळी

अंगी भानामती येई

बाधा होता कसलीही


बळी लेकराची घेई

गुप्त धनाची लालसा

अंधश्रद्धा भोंदूवरी

होती नवसाने पुत्र

मग लगीन का करी


भोंदूगिरी,जादूटोणा

कीड समाजा लागली

व्हावा विज्ञान प्रसार

शक्ती अघोरी वाढली


युग असे विज्ञानाचे

गेला चंद्रावरी नर

सोडा रुढी परंपरा

ठेवा श्रद्धा स्वतःवर


अंधश्रद्धा निर्मूलन

आज गरज काळाची

करावया उच्चाटन

कास धरा शिक्षणाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational