STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

4  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

अनाथांची ती माय

अनाथांची ती माय

1 min
323

प्राॅ - १२


१२/०५/२०१९


कवितेचे शीर्षक - अनाथांची ती माय


तिचं नव्हतं ते बाळ

तरी लागला लडिवाळा,

पाहता क्षणी फुलास

मायेचा कंठ फुटला ॥१॥


नापिक होती जमीन ती

'वांझोटी' म्हणून हिणवले,

बीज रूजाया कठीण

भावनांना पायी चिरडले ॥२॥


दिली भेट आश्रमाला

अनाथ, पोरक्या लेकरांना,

अन् पाझरली माया तिची

गवसली वाट नयनांना ॥३॥


त्यांच्या सहवासात ती

रोज नव्याने रमू लागली,

पंख हरवलेल्या त्यांची

आई होऊ पाहू लागली ॥४॥


अनाथांना तिच्या रूपे

लाभले मातृत्वाचे पंख,

सुखाचा नवा प्रारंभ

झाली दुःखाची राख ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational