अनाथांची माय
अनाथांची माय
अनाथांची होती जीला कणवं..!!
समाजसेवेची मोठी तीस हावं..!!
मरावं परी किर्तीरुपेचं ऊरावं..!!
माई हे दु:ख कसं बरं सोसावं..?
दिसे समोर आठवणींचा गावं..!!
अचानक हा काळजावर घावं..!!
डोळ्यांतले आसु कुठं दडवावं..?
माई हे दु:ख कस बरं सोसावं..!!
लेकरांनी तुझ्या कुणाकडे पहावं..!!
दु:ख सोसण्याच बळ देवानं द्यावं..!!
सकाळी उठता वाईट स्वप्नं ठरावं..!!
माई सांग तुच दु:ख कसं सोसावं..?