STORYMIRROR

Pranjali Kalbende

Inspirational

3  

Pranjali Kalbende

Inspirational

अमर शहिद

अमर शहिद

1 min
218

एक अमर शहिद

स्वातंत्र्याचा लढवय्या

भगतसिंगाचे नाव

इतिहासी गाजतया.......१!!


सरदार होता तोच

जीव पणास लाविला

देशास्तव आजिवन

बंड लढा पुकारिला.......२!!


शक्तिशाली ब्रिटिशांचा

केला साहसी सामना

झाल्या कितीही देहास

अती दाहक वेदना......३!!


पंजाबचा देशभक्त

शिख परिवारी पुत्र

वंश संस्कार घेऊन

जीवनाचे चाले सुत्र........४!!


वर्ष चौदावे वयाचे

संगी क्रांतिकारी संस्था

जागरूकतेचे पर्व

देश प्रेमाची अवस्था.......५!!


फक्त झोकले स्वतःला

स्वातंत्र्याच्या सत्कर्मात

स्वहिताला डावलून

देशहित विचारात...........६!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational