STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

अक्षय तृतिया...!

अक्षय तृतिया...!

1 min
525

अक्षय तृतिया...!


आज 

अक्षय तृतिया

अक्षय 

म्हणजे काय..?

हा मोठा प्रश्न

पण 

खर सांगू

अक्षय फक्त

आणि फक्त

प्रेमच...!

मग ते

कोणतही असो...

आईचं

बाबांचं

भावाचं

बहिणीचं

सर्व नात्यांचं

गुरुचं

मित्राचं

आणि

शत्रूचंही..

पण सत्य एकचं

प्रेम प्रेम असतं

आणि

ते अक्षय असतं

अगदी

चिरंजीव

अश्वत्थाम्याच्या

भलभळणाऱ्या जखमेसारखं

किंव्हा

द्रौपदीच्या अक्षय पात्रा सारख.

किंव्हा सदैव 

अविरत तेवत राहणाऱ्या

नंदादीपा सरखं...!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

prashants9606@gmail. com

8007740679


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational