STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

अजून एकदा

अजून एकदा

1 min
235

सरत्या नभास लाली, अजून एकदा

वेळ मिलनाची झाली, अजून एकदा


मिट्ट रात्रीस पाठी, टाकून पुन्हा

सांज परतून आली, अजून एकदा


दिली जागृती अशी, तुझ्या पावलांनी

आली फुलांना उभारी, अजून एकदा


भास चांदण्यांचे मी, कवळुनी उशाला

वाट पाहतो किनारी, अजून एकदा


तुझा महाल सजवताना, गाते कुसुमराज्ञी

ती ही वसंता पुकारी, अजून एकदा


सुगंधी होईल सारा अनिल स्पर्शिणारा

केसांत माळ तू कस्तुरी, अजून एकदा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance