अजब दुष्काळ..!
अजब दुष्काळ..!
सांग देवा देतोयस कुठल्या कर्माची शिक्षा?
एकच विनंती,दे रे तू स्वक्तत्र्याची भिक्षा
पाऊस नाही देणार ठरवलंस तर हे जीवनच का दिले?
पिकाचा नाही येणार ठरावलंयस तर संपूनच गेलेले बरे
गेली कित्येक वर्षे म्हणतोय एवढंच शेतकरी राजा
अन सांत्वना देणारे उगीच म्हणतात,देव पाहतोय माझा
एकदाच सारं वाढून दिले तर जेवण कसे जाणार?
अन एवढा पाऊस पडला तर पीक कसे येणार?
आता इच्छा एकच देवा जीवन सुखाचं घडू दे
माझं शेत रडणार नाही असा पाऊस सुखाचा पडू दे..!
