अजाणवाट
अजाणवाट
प्रत्येकाचे जीवन ही कथा असते.
त्यात संत वाहत जाणारी व्यथाच दिसते.
जीवन संघर्ष कॅन्सर पिडीताची परिक्षाच घेतोय.
ज्यांना जगायचे त्यांनाच अजाण वाटेकडे नेतोय.
मनातले वादळ बोलले, वो! डॉक्टर मला जगायच....
मी पाहिले तिला जवळून रोजच तडपत मरताना.
जीवन जगायची इच्छा घेऊन अश्रु ढाळताना.
जीवनात बरच काही करायंच.
समाजाचे देणे देत समाज सेवा करायंच
मनातले वादळ बोलले, वो!डॉक्टर मला जगायच....
आज शरीर हे मला का साथ देत नाही.
बरेचदा येऊन मी बरी होऊन घरी गेले.
काय?माझी जायची वेळ आली.
तिचे ते शब्द काळजाला भोके करून गेले.
मनातले वादळ बोलले,वो!डॉक्टर मला जगायच....
तिने कळू दिले नाही काहीच,
डॉक्टराने सांगितले जीवन आहे थोडेच.
अश्रु स्वतः सांगत होती तिची व्यथा,
कशी सांगू मी आई बाबास माझी जीवन कथा.
मनातले वादळ बोलले,वो!डॉक्टर मला जगायच.....
डॉक्टर विचारत होते जीवन जगण्याचा संघर्ष,
सर्वांच्या भेटीस श्वास ठेवला रोखून.
डोळे भरुन सर्वांन कडे पाहत,
निघाला अश्रु अन गेला प्राण डोळ्यातून सोडून.
मनातले वादळ शांत जाहले, अजाण वाटेला लागले.....
मरण आले दारात हे तिने जाणलं
क्रियाकर्म करणा-याचा नंबर तिने लिहून ठेवलं
हॉँस्पिटल मधून थेट स्मशानात ने रे भाऊ.
माझ्या आईचे अश्रु अन खोटे मतलबी रडणारे नको दाऊ.
मनातले वादळ शांत जाहले, अजाण वाटेला लागले.....
