ऐकते हो कोण येथे
ऐकते हो कोण येथे


मी कशाला गीत गावू ,ऐकते हो कोण येथे
दीप मी उजळू कशाला जागते का.... कोण येथे(१)
डोळ्यातली स्वप्ने इथे ही चित्रा परी मी मांडली.
दाखवावी ती जगाला थांबते पण.... कोण येथे? (२)
दूर गेल्या सर
्व होड्या पार क्षितिजाला मिळाल्या
भंगलेली नाव माझी दाखवू कोणा.. येथे?(३)
कोणी न साथी संगती एकलेपन बोचते.
प्राक्तनाची धार ताजी कापते प्राणास..येथे?(४)