अहंकार
अहंकार
आला जन्मास मानवा
नको करू अहंकार
देह मिळाला फुकट
मान देवाचे आभार...१!
सर्व काही ईश्वराचे
तरी करी माझे माझे
देहातून जाई प्राण
होई पापाचे रे ओझे...२!
कर्तव्याचे रे पालन
कर जीवनात कष्ट
अहंकार होता मती
होई कशी बघ भ्रष्ट...३!
पैसा,धन,संपदा ही
आहे क्षणिक हे सुख
नाते प्रेमाचे नसती
मोहमाया देई दु:ख...४!
समाधान मिळे तेव्हा
मुखी घेई हरी नाम
आई बाबांच्या चरणी
असे बघ चार धाम...५!
