STORYMIRROR

Latika Choudhary

Tragedy

2  

Latika Choudhary

Tragedy

अग्नीपरिक्षा

अग्नीपरिक्षा

1 min
13.7K


 दूषित झालीत मनं अन समाज,

 सिध्द करीत आहे स्त्री आयुष्यभर

 तिचं अस्तित्व अन अस्मिता.!

    पुन्हा पुन्हा केलं जातंय उभं

तिला पिंजऱ्यात आरोपीच्या,

 अन घातलीय खीळ त्यानं

 तिच्या विकासावर सदोदित.!

   उभं राहण्याच्या प्रयत्नात

 'ती' मोडून पडण्याचीच जास्त 

 शक्यता..... .. कारण....

 वधस्तंभ ठरतेय आंधळी 

 न्यायव्यवस्थाही ....!

 कित्येक झालीत संमेलने,

 सभा,ठराव,चर्चा, चळवळी...पण...

 संपत नाही पक्षपाती कटकारस्थान

 अन संपतच नाही तिची अग्नीपरिक्षा

 फिनिक्स होत जाताना!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy