अधुरी प्रेम कहाणी
अधुरी प्रेम कहाणी
तूझ्या प्रेमात सजना
झाले होते मी बेधुंद
आजही मंद प्रकाशात
दरवळतो तुझ्या प्रेमाचा गंध
तुझ्या विरहाचा मला
सोसवत नाही भार
तुझी आठवण सख्या
आजही सतावते फार
नदी किनारी बसून दोघ
स्वप्नांमध्ये भरायचो रंग
उगाच अचानक झाला
का रे आपले प्रेम भंग ??
माझ्या डोळ्यातून वाहतो
आश्रूचा महापूर
का गेलास मला अर्ध्यात
सोडून सजना तु दुर
चंद्राला ही लाजवेल
असे प्रेम होते आपले मधुर
कळलेच नाही तुला मला
कधी झाली प्रीत आपली नासुर !!
काय होते प्रेम आपले
काय झाली प्रेमाची कहाणी
तुझ्या माझ्या खोट्या गर्वात
राहीली आपली प्रीत अधुरी
