STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Others

3  

Rohit Khamkar

Fantasy Others

अबोला

अबोला

1 min
339

घडलंय बिघडलंय असं काही, फक्त खुणा बाकी दिसतात.

आठवण्यासाठी आणखी काय लागतंय, ह्याच त्या आठवणी असतात.


आधीही खूप वेळा भांडलोय, पण या वेळी जरा जास्त भीती वाटतेय.

असा कसा हा रुसवा तुझा, जो की केव्हाचा जातोय ते पाहतेय.


बोललो असेल काही चूक, पण तू ही काही कमी नाई.

शांत झालो दोघं की, आठवण एकमेकांची येई.


पण तोपर्यंत काय, तू तिथे मी इथे.

अशी कशी अचानक, भडकली आपली माथे.


माफी मी मागतो, आता तरी बोल.

सोड सारा रुसवा, नव्या शब्दांना तू खोल.


आता तरी सांग, तुझा राग आहे का गेला.

चांगलं नाही दिसत, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर अबोला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy