STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Romance

3  

मैथिली कुलकर्णी

Romance

अबोल प्रीत

अबोल प्रीत

1 min
329


तुझी आणि माझी

प्रीत अशी फुलली....

पाकळीसम हळुवार

हृदयात उमलली।।


तुझ्या संगे राहुनी मी

मजला हरवली.....

स्मित हास्यातूनी

प्रीत तुझी चाखली।।


तुझी प्रीत मजला

सहवासाने कळली....

तृप्त होऊनी मी

विसावली गेली।।


तुझ्या भावना सख्या

डोळ्याने मी अनुभवली....

बोलकी मी असूनही

तुला न्ह्याहळत गेली।।


तु चंद्र मी चांदणी

तुझ्या प्रकाशात न्हाली....

प्रेरणेने तुझ्या मी

चमचमती झाली।।


प्राणसख्या रे ही

प्रीत आहे कसली?

'अबोल प्रीत 'नको

मला ही असली।।


अव्यक्त तु राजसा

व्यक्त मी रे झाली....

प्रीतीत तुझ्या प्राणप्रिया

मोहरून गेली।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance