अबोल प्रीत
अबोल प्रीत
शब्द नाही सुचत कधी
भावना व्यक्त करायला
तू समजून घे ना त्या
डोळ्यांच्या भावनांना
ओठी येत नाही कधी
मनातले सांगायला
तू समजून घे ना त्या
बंद ओठातल्या शब्दांना
तू जवळ नसतोस कधी
मला सावरायला
तू समजून घे ना त्या
विरहाच्या वेदनांना
सुर जुळत नाहीत कधी
तुझे गीत गायला
तू समजून घे ना त्या
अंतरीच्या सुरांना
मी राधा नाही झाली कधी
तुझ्याशी रंग खेळायला
तू समजून घे ना त्या
अबोल प्रेमाच्या रंगांना

