अबोल प्रीत फुलताना...
अबोल प्रीत फुलताना...


अबोल प्रीत फुलताना ह्रदयात तू लपावे..
गाणे हळुवार प्रीतीचे मनात मी जपावे...||धृ.||
पाहताना मला क्षणिक तू लाजावे
प्रीतीच्या चांदण्यात चिंब मी भिजावे..
नाते असेच आपले ओल्या भावनेत लिंपावे,
गाणे हळुवार प्रीतीचे मनात मी जपावे....!
मला पाहताना, तुला मी पाहावे
अलवार तुझ्या ह्रदयात राहावे..
चांदणे प्रेमाचे असेच शिंपावे,
गाणे हळुवार प्रीतीचे मनात मी जपावे...!
तुझ्याचसाठी आणीन तोडून तारे
ह्रदयात वाहतील आपल्या प्रीतीचेच वारे...
बंध त्या विरहाचे तू अलगत कापावे,
गाणे हळुवार प्रीतीचे मनात मी जपावे...!