अभंग विठुराया
अभंग विठुराया
विठ्ठल सावळा ।उभा विटेवरी ।
चंद्रभागे तीरी ।पांडुरंग ॥
गोजीरे ते रुप ।बघते मी डोळा ।
येतसे उमाळा ।अंतरात ॥
राहो सदा मुखी ।विठ्ठल ची नाम ।
हेची कर्म काम ।सदाकाळ ॥
उठता बसता ।स्मरते तुजला ।
तारण्या मजला ।तुच देवा ॥
कसे वर्णू गुण माझी अल्पमती
तव नाम चित्ती ।ठेवीतसे॥
हेची दान दे गा ।आले मी शरण ।
दाखवा चरण ।मजलागी. ॥
मनी एक आस ।दिंडीत जाण्याची ।
दर्शन घेण्याची।वैशालीची॥
