अभिनय सम्राट
अभिनय सम्राट
अभिनेता अमिताभ
ख्यातनाम कारकीर्द,
अलौकिक व्यक्तिमत्व
गाजे सिनेमात मर्द..!!१!!
केले सोने भूमिकेचे
पहिलाच पुरस्कार,
सर्वोत्कृष्ट सहाय्यक
लोकप्रिय कलाकार..!!२!!
उंच शरीरयष्टीने
डोळे भेदक रोमांच,
भारदस्त आवाजाने
गाजवले रंगमंच..!!३!!
अभिनय सम्राटाचे
पद सदैव भूषवी,
गाजे रुपेरी पडदा
अशी भूमिका गाजवी..!!४!!
पत्नी, मुलगा, सूनही
परिवार कलावंत,
चित्रपट सृष्टीतील
कलाकार नामवंत..!!५!!
चालू कार्य अद्यापही
सत्तरीत उत्साहात,
लाजवतो तरुणांना
तारा महानायकात..!!६!!
