STORYMIRROR

Vinay Dandale

Tragedy

4  

Vinay Dandale

Tragedy

अभाळझरा

अभाळझरा

1 min
142

सावकाराच्या आसनस्थ  

तिजोरीचा कप्पा 

अन् 

माझ्या बापाच्या फाटक्या

बांडीसाचा खिसा 

जमीन अस्मानचा फरक आहे यात  


सावकाराच्या तिजोरीच्या कप्प्यात 

कोऱ्या कोऱ्या 

गांधीजींचा फोटो असलेल्या  

लहान मोठ्या नोटा 

व्यवस्थित रचलेल्या 


माझ्या बापाच्या 

फाटक्या बांडीसाच्या खिशात 

घड्या पडलेली सातबाराची पानं  

सोबत  

अंगठा लावलेला कोरा कागद 


माझ्या डोळ्यात तरंगतोय 

सावकाराचा मिश्किल हसरा चेहरा  

अन्  

माझ्या बापाच्या पापण्यांत  

आभाळझरा ..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy