STORYMIRROR

Bharati Sawant

Tragedy

3  

Bharati Sawant

Tragedy

अभागी बालिका

अभागी बालिका

1 min
197

 अभागी बालिका असू आम्ही

काय आम्हांकडून घडले पाप

नाही शाळा नि पुस्तकही ठावे

लाभलाय हा व्यसनाधीन बाप


खेळायचे आणिक बागडायचे

वय आमचे हे स्वैर नि स्वच्छंदी

जगतोय गोळा करून हा कचरा

लावली जीवनावर सारी पाबंदी


भरते गोणी प्लाष्टिक कचर्‍याने

दिवसभर फिरतोय हो वणवण

आगडोंब उसळे पोटात भुकेचा

रात्रीला येते तापाचीच कणकण

 

शिकावी वाटते शाळा आम्हांला

शोधतो मग पुस्तक या भंगारात

वाचून काढतो झोपताना सारेच

नशिबात लिहिले कष्टच दिनरात


सरकार लेकींना पुरवतेय कळले

मोफत शिक्षणाच्या सेवासुविधा

गरीब भिकाऱ्याच्या भाग्यातच

रिकाम्या पोटाची व्यवस्था द्विध


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy