Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational Others

2  

Abasaheb Mhaske

Inspirational Others

आयुष्यच आपुले होईल गाथा ..

आयुष्यच आपुले होईल गाथा ..

1 min
6.8K


सौंदर्याची खाण तू , यौवनाचा भार तू 

नको होऊस कधी समृद्ध जगण्याची अडगळ 

पेरत जा सुखाची हिरवळ , पसरू देत प्रेमाची दरवळ 

सोडव फक्त तू शिताफीनं ...,आयुष्याचा गुंता... 

रडू नकोस , कुढू नकोस , पश्चाताप तर अजिबातच करू नकोस

झालं गेलं विसरून जा , कशाला बसायचं तेच दुःख उगाळत 

हवं तर असं समज , लग्नानंतरची जणू फारकत 

नाही तर नाही नेहमीच नसतं ग मनासारखं घडत 

तोडून टाक हे मायावी पाश ,खरं सांगतो ग ... 

याशिवायही आहे जगात करण्यासारखं खूप काही.. खास  

सौंदर्याला शाप कोमेजण्याचा , अहंकार फुकाचा ठेवू नकोस 

करू नकोस ग व्यर्थ चिंता , सुटेलही आयुष्याचा अवघड गुंता 

फक्त एवढे लक्षात ठेव , तारुण्य असते दोन घडीचे 

फुलाचेहि भाग्य असते देवरा सजविण्याचे तसे 

निर्माल्य होऊन कधी तरी नशिबी येते जाणे गटारास 

विश्वमात्रा कुणा बनवू नकोस , होऊ नकोस कधीच रंभा 

प्रेमभंग ही विसर आता , लिहू खुशाल यथावकाश प्रेमाची गाथा 

नाही साथ तुझी भलेही , गुड लक तुझंच सदैव सोबतीला

राखेतूनही प्रेरणा घेऊन , झेप घेईंन फिनिक्स होऊन 

करील विधायकी असे काही की , आयुष्यच आपुले होईल गाथा ...

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational