STORYMIRROR

Rajesh Sabale

Romance Tragedy Others

4  

Rajesh Sabale

Romance Tragedy Others

आयुष्याच्या सांयकाळी (आठवण)

आयुष्याच्या सांयकाळी (आठवण)

1 min
667

आयुष्याच्या संध्याकाळी, आठवतेस तू अजून जराशी।

तोच पार अन तीच आगासी, तेच स्वप्न अजून उराशी।।धृ।।


तुझी अन माझी प्रीत फुलापरी, कळीसारखी उमलत जाई।

गजरा होता माळलास तू, वेणीवरती तो झोके घेई।।

घेऊन फिरतो ध्यास मनीचा, स्वप्ना मधल्या गोड कळीचा।।

झोपळाही बांधीत फिरतो, तुझ्या प्रीतीच्या आठवणींचा।।

आता पाहीले त्या पारावर, म्हणून म्हणालो थांब जराशी।

आठवण आली त्या दिवसांची, गोष्ट सांगतो तुला जराशी।।१।।


आठवते का सांज वेळ ती, इथेच घडली प्रेम कहाणी।

रोज पाहतो याच ठिकाणी, वाट तुझी मी केविलवाणी।।

जुन्या पुरान्या फोटोमधला, पडका वाडा घाटावरचा।

त्या घाटाच्या मातीमधला, फोटो आपला तरुणपणीचा।।

घाटावरच्या पायरीवर तू, बाळगलेस जे स्वप्न उरासी।

डोळ्यामध्ये अजूनही दिसतो, नदी काठच्या घाट जराशी।।२।।


हातात होते हात दोघांचे, मन वाऱ्यावर विहरत होते।

त्या भेटीची अजून मलाही, मोर पिसाची आठवण येते।।

आता पाहतो हातात काठी, नातवंडांना घेऊन पाठी।

या पारावर उगाच फिरते, प्रेम अधुरे पाहण्यासाठी।।

डोळे होते डबडबलेले, भीती अनामिक होती जराशी।

उगाच चोरून पाहिल कोणी, म्हणून वाटते खंत 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance