STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Tragedy

आयुष्याची वाट

आयुष्याची वाट

1 min
629

धुकं पसरलंय सभोवार, तुझ्या आठवणींचं आज

हरवलीय त्यातच माझ्या, आयुष्याची वाट


अस्पष्ट झालेत दिवे, अन् झालेत अंधुक तारे

न जाणो कोण्या अंधारात, विरलेत प्रकाश सारे

एकांताच्या कृष्णविवरात शिरलोय, तुझ्याशिवाय मी आज

हरवलीय त्याच कृष्णविवरात माझ्या, आयुष्याची वाट


अनेकदा ठोठावूनही बंदच आहेत, तुझ्या मनाची दारे

भरकटवतायत तुझ्याकडून मला, काळोखी वादळी वारे

पोहोचलोय आयुष्याच्या क्षितिजावर, तुझ्याशिवाय मी आज

हरवलीय त्याच क्षितिजावर माझ्या, आयुष्याची वाट


तुझ्या तसबीरीचे तुकडे अजूनही, मी आहे कवटाळून हृदयाशी

श्वास गुंततोय त्यात माझा, येऊ पाहतोय तुझ्यापाशी

विसावलाय आत्मा माझा, तुझ्याच तसबीरीत आज

हरवलीय तुझ्याच तसबीरीत माझ्या, आयुष्याची वाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy