आयुष्याची पाटी
आयुष्याची पाटी
आयुष्याची पाटी कोरी
कर्तृत्वाने रेखायची
सुख-दुःख सोबतीला
समानच मानायची
कधी हस-या क्षणांचा
मनावरी शिडकावा
कधी हळव्या दुःखांनी
मन दर्पण तडकावा
मैत्री गप्पागोष्टी चेष्टा
मनसोक्त आनंदाच्या
बोच अपमान दुःख
अंतर्मनी सलण्याच्या
कर्तृत्वाची नोंद होते
ठळकचि पाटीवरी
भल्या-बु-या कर्मांचीही
नोंद असे पाटीवरी
माया दया अनुकंपा
मनू सत्कर्मा प्रवृत्त
देई हात गरीबाला
ठेवी जीवाला जिवंत
आयुष्याची पाटी सवे
ज्योत विझल्यावरती
चित्रगुप्त हिशोबासी
अन् प्राक्तन संगती