आयुष्याची दोरी तुझ्या हाती...
आयुष्याची दोरी तुझ्या हाती...
माझ्या आयुष्याची दोरी तुझ्या हाती कायम असावी.
साथ तुझी-माझी छोट्याश्या कारणाने कधीच ना सुटावी.
तू मला नी मी तुला नेहमी समजून घ्यावे उमजून घ्यावे.
आयुष्याचे हे जीवनगाणे आनंदाने मिळून गावे.
जाता तोल माझा तू सावरावा,मिठीत येता तुझ्या जीव माझा सुखावा.
तुझ्या प्रेमात जीवनाचा हा झुला अखंड झुलावा.
मनात माझ्या तुझ्या आठवणींनी फेर धरुनी झिम्मा घालावा.
कधीच न सुकणारा दोघांमध्ये कायम प्रेमळ ओलावा राहावा.
माझ्या आयुष्याची दोरी तुझ्या हाती असावी.
कधी घट्ट तर कधी सैल ती तू धरावी,पण कधीच तुझ्या हातातून ती न सुटावी.

