आयुष्य
आयुष्य
आयुष्य आहे सुंदर कोडे
सुख दुःख त्यावरचे उत्तर
सारे उपभोगून जीवनात
संकटाला द्यावे प्रतिउत्तर
करतील हताश काही क्षण
कोंडल्या जाईल श्वास दुःखानी
जगणे वाटेल तेव्हा नको
गोठेल हुंदका आसवांनी
यातना सोसतांना
देह होईल क्षीण
आत्मा करेल मनी कामना
प्राण येईल कंठाशी अन्
सांगेल थांबवण्यास वेदना
तेव्हा झाले गेले विसरून
जगण्यास खरी नवीन
सुरूवात करावी
मानव जन्म अनमोल
हसत- खेळत आयुष्याची
किंमत मोजावी..