STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Inspirational

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
205

आयुष्य काटेरी फुलांचे राजसा

वारे तुफानी वादळांचे राजसा


ढाळून अश्रुंना जरा हासून घे 

गाणे स्मरावे पावसांचे राजसा


मोठ्यात मोठ्या संकटाशी खेळ तू 

हे खेळ सारे भावनांचे राजसा


वाळून गेले स्वप्न माझे कोवळे

आभाळ नाही सावल्यांचे राजसा


काट्याविना नाही गुलाबांची फुले 

चिखलात जीवन पंकजांचे राजसा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational