आयुष्य
आयुष्य
आयुष्य मला रोज
नवी आशा देते
तू सोबत असताना
नवी दिशा मिळते
आयुष्यात मला रोज
इंद्रधनुष्याचे रंग भरते
तू सोबत असताना
जीवन नव्याने बहरते
आयुष्य मला रोज
गंध प्रितीचा देते
तू सोबत असताना
प्रित ती फुलते
आयुष्य मला रोज
नवे शब्द देते
तुझ्या सोबतीने
आपले घरकूल हसते
आयुष्य मला रोज
नवे ध्येय देते
तूझ्या साथीने
सख्या ते पूर्ण करते
आयुष्य मला रोज
नवे स्वप्न देते
तूला सोबत घेऊन
आज ते साकारते

