आयुष्य थोडं जगून बघ
आयुष्य थोडं जगून बघ
स्वतःला कधी सिद्ध करून बघ
स्वतःच्या दुःखात हसून बघ
जगणं विसरून जाण्याइतकं आयुष्य सोप्प नाही
कधीतरी दुसऱ्यासाठी जागून बघ
पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात करताना
अलगद स्पर्श करून बघ
तुझेच गाणे तुला साद देतील
शब्द जे तु विसरली होतीस
पुन्हा एकदा मैफिल जमेल
तुझा आवाज ऐकून बघ
बिझी तर उद्यासुद्धा असशील
आज आईची जागा घेऊन बघ
काम परत करता येतील
आयुष्य थोडं जगून बघ
