STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

आयुष्य तारण राहिले

आयुष्य तारण राहिले

1 min
620

वेड्या माझ्या मनाला मी, तुझ्यात गुंतताना पाहिले

भारलेल्या त्या क्षणांना, माझे आयुष्य तारण राहिले


प्रीतगंगेच्या पश्चिमतीरी, तुज पहिल्यांदा बघितले

गालावरती होते तुझ्या, सूर्यकिरण विसावले

बोल काही मनातले, तुझ्या ओठांवरती उमटले

आसुसलेले मन माझे, क्षणात एका सुखावले

प्रतिबिंब या देहाचे, मी लोचनी तुझ्या पाहिले

भारलेल्या त्या क्षणांना, माझे आयुष्य तारण राहिले


सरली तिथे वेळ किती, ना मग आपणास कळली

सोबतीला आपल्या केवळ, तारकांची, दीपमाळ उरली

गुजगोष्टींत दोघांच्या अलगद, सुगंधी रातराणी फुलली

ओघात त्या धुंद ती, तरुण रात्र सरली

स्पर्शूनी तुला तुझ्यास्तव, प्रणय गीत मी गाईले

भारलेल्या त्या क्षणांना, माझे आयुष्य तारण राहिले


सोडून आता मला एकटा, दूर नको तू जाऊ

सूर्यास्त उद्याचा पुन्हा एकदा, डोळे भरूनी पाहू

प्रीतकिनारी त्या दोघे, जीवनाचा खेळ खेळत राहू

स्वप्नांत इथेच भविष्यातल्या, गुंतून दोघे जाऊ

चार क्षणांचे आयुष्य माझे मी चरणी तुझ्या वाहिले

भारलेल्या त्या क्षणांना, माझे आयुष्य तारण राहिले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance