आयुष्य जगताना....
आयुष्य जगताना....
आयुष्य जगताना मरण सामोरे आले
आणि मग लक्षात आलं की जगणे राहून गेले
आपली म्हणणारीच माणसं जेव्हा परिस्थिती
पाहून दोन हात ठेवून वागू लागली
तेव्हा कळालं "unconditional love"असं
खरचं काही नसतं.
पैसा असताना एक treatment आणि
पैसा नसताना एक treatment मिळू लागली
तेव्हा कळालं पैसा सर्वस्व नसला तरी पैशामुळे
सर्वकाही असतं.
हे मात्र अगदी खरं जोवर शीत तोवर भूत
परिस्थितीवर माझ्या अनेकजण हसले
बर झालं इची आता जिरली.
आपल्या माणसांबरोबर जसा वेळ कसा जातो
ते कळत नाही ना,
तसचं वेळेबरोबर आपली माणसं कोणती तेही कळालं.
शाश्वत असं काहीचं नसत तरी ही
हे माणसाच मन प्रत्येक गोष्टीसाठी झुरत
दिवस-रात्र काम करून शरीर थकत
शेवटी मात्र.....
आयुष्य जगताना जगणं राहून जात
आणि मरण समोर येऊन उभं ठाकत.
