STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

आव्हानं

आव्हानं

1 min
127

आव्हानं हीच कार्य करण्याची प्रेरणा देतात,

जिथे आव्हानच नसतात, अशी माणसं कार्यशून्य ठरतात


गरज आणि संघर्ष या गोष्टी, कार्य करण्यासाठी प्रेरक ठरतात,

आव्हानात असतं एक आकर्षण,आव्हानंच इतिहास घडवतात


परिस्थिती बिकटच असायला हवी, तीच तुम्हाला घडवते,

गोष्टी सोप्या,हलक्या असू नयेत, तीच आपली वाढ खुंटवते


यश नेहमी आव्हानांच्या, घरी मुक्कामाला असते,

तुम्ही आव्हानं स्वीकारा, यश तुम्हाला स्वीकारते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics