STORYMIRROR

Suresh Kulkarni

Classics

3  

Suresh Kulkarni

Classics

वाद्ये

वाद्ये

1 min
149

ताण असुनी पीळ असुनी 

बोलती मधुर मधुर हे छान

मानवा, 

घे या वाद्यांकडूनी ज्ञान!


रागवू नको ओरडू नको

असो कितीही ताण

ठेव शांती राख संयम 

वाग सदैव सुजाण 

मानवा,

घे या वाद्यांकडूनी ज्ञान!


सोशिकता देई महता

शांती सबुरी क्षमा 

नित छान सर्वथा

सतार बोले सदैव सुस्वरे 

तार जरी छेडता

ठेव मनी ही जाण !

मानवा,

घे या वाद्यांकडूनी ज्ञान! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics