Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

3  

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

कालाचक्र

कालाचक्र

1 min
181


निपचीत पडलेल्या रस्त्यावर 

वाळून भुरभूरत झालेली पानं

एक एक करतं जमा होतायतं आणि 

एखाद्या हलक्याश्या झुळूकेनही

ती पानं तिथल्याच कुठल्याश्या

कड्याकप-यात अडकून बसलीत

खाली पानांचा सडा आणि 

वर टळटळीत सूर्य 

आपल्याच तद्रीत तळपतोयत

ऋतू येतात ऋतू जातात

पान फुलं नव्यानं उमलतात आणि वठतात सुद्धा 

भोगलेल्या ऋतूंचे सोहळे अनुभवत अनुभवत पुन्हा गळून पडतात

कालचक्र आणखी दुसरं काय !

काटेरी बंधन , कोडलेली नाती

उगवणारा सूर्य , वितळणारा पारा

हे न संपणार ऋतूचक्र अव्याहत सुरूच आहे

एक एक पान फडफडत राहते आणि 

शिशीराबरोबर गळून पडतं

आणि काळजात मनात एक 

पोकळी निर्माण करून जातं

आजही तिथल्याच डोहात त्या वाळक्या फांद्या 

पुन्हा एकदा गळून पडल्या 

पुन्हा एकदा .......


कालाचक्र आणखी दुसरं काय !!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract