STORYMIRROR

Umendra Bisen

Romance Classics Others

3  

Umendra Bisen

Romance Classics Others

पाऊस पहिल्या प्रेमाचा

पाऊस पहिल्या प्रेमाचा

1 min
243


मेघ दाटून आलेले

होता जूनचा प्रवास

आला पाऊस पहिला

झाला आनंद मनास


तिला बघीतले आज

भिजताना पावसात 

होती जणू आनंदात

बळी मी गेलो प्रेमात


तिचे निनांद तेजस्वी

रूप आवडले मला 

एक टक न्याहाळत

बसलोय जणू तिला


तिला आवडे पाऊस

मला ती पावसातच

जणू बळी गेलो होतो

मीच पहिल्या प्रेमातच


नाही विसरता येत

क्षण पहिल्या प्रेमाचे 

त्याच क्षणाला मला

भाव कळले मनाचे


आले पहिले पाऊस

जणू प्रेमच घेऊन

गेले जेव्हा परतून

आले हृदय भरून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance