जन्मजान्हवी
जन्मजान्हवी
माझ्या मातीच्या अंगाने
मी खोदतोय माती
तुझ्यामाझ्या मुळातली.....
त्या मातीतून तू बरोब्बर
सोने वेचतेस मात्र ;
आणि पांघरतेस
माझ्या नाम अनाम
व्यक्तिमत्वावर...
शिणून मी रुतून बसतो
तसाच मातीत
परंतु तू सदैव
कडेवरचे बालकडवे सांभाळत
तजेला तोलून धरते...
मी तुला काय म्हणू
जन्मजान्हवी की
माझी कायम प्रेयसी ??
इथेही शब्दच थिटे पडतात मला
आणि मग
सपशेल शरण जाऊन
मी तुझ्याच सुपूर्द करतो
कायम
माझी माती !!!
