निसर्गरक्षक
निसर्गरक्षक
हिरवीगार सृष्टी
नयन सुखावती
कुशीत मानवाला
सुरक्षित ठेवती..
आई जशी मुलांची
चूकभूल माफ करे
निसर्गही मनुष्याचे
गुन्हे नजरेआड धरे..
मूलभूत गरजा पुरवी
हिच सृष्टी देवता
तिला दुःखी करुनी
कशी सुखात मानवता..
जंगलतोड थांबवून
झाडे जतन करूया
सागरकिनारा सुंदर
स्वछतेचा प्रण घेऊया..
सौंदर्य सृष्टीचे बहरु
रक्षक पर्यावरणाचे
तारक नाही मारक बनू
आपल्याच जीवनाचे..
