STORYMIRROR

प्राची जगताप बामणे

Others

3  

प्राची जगताप बामणे

Others

चाहूल

चाहूल

1 min
112

चातकाला लागे पावसाची चाहूल,

प्रेमाला लागे प्रियकरांची चाहूल..

मानवाला लागे विश्वासाची चाहूल,

जगताना लागे नात्याची चाहूल..


इतक्या सहज कसे नि कुठे,

नाते मनाचे मनाशी जुळते..

चाहूलीच्या खेळावर मग ते,

कुठेतरी स्वतःला हरवून बसते..


सुख दुःखाच्या चक्रामध्ये,

अडकून जातो मनुष्य..

चाहूल लागताच सावरतो,

अनुभव मिळतो प्रत्यक्ष..


ऋतू बदलतो निसर्गाप्रमाणे,

सृष्टीला चाहूल लागते काही..

माणूस बदलतो मनाप्रमाणे,

हृदयास चाहूल लागत नाही..


चाहूल आहे असा एक भाव,

आवडता असो किंवा नावडता..

अनुभव प्रत्येकाला देऊन जातो,

शिकवण मिळते जगता जगता..


Rate this content
Log in