STORYMIRROR

प्राची जगताप बामणे

Tragedy Others

4  

प्राची जगताप बामणे

Tragedy Others

जळत राहते संवेदना

जळत राहते संवेदना

1 min
408

समाजात जगताना *सखे* 

नजरेत प्रश्न अनेकांना,

पाहतात वळून *सारखे* 

 *जळत राहते संवेदना..* 


निसर्गाची देणगी जन्म हा

असा लाभ झाला *आमचाच,* 

चूक काय त्या मायबापाची

दैव फुटके *नशिबालाच..* 


ठाव नसे शरीराला मग

जगायचे ते *कोणासारखे,* 

मन स्त्रीचे शरीर पुरुषी

पांघरून नकली *बुरखे..* 


सुधारित समाजाला सांगा

बुरसट विचार *सोडा ना,* 

जाणवून देती विषमता

 *जळत राहते संवेदना..* 


हिणवती हिजडा म्हणुनी

सल टोचत राहते *मना,* 

जगू कसे ती का तो होऊन

मरू लागली हर *वेदना*..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy