STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics Inspirational

3  

Sanjana Kamat

Classics Inspirational

विरुद्धार्थी काव्यरचना

विरुद्धार्थी काव्यरचना

1 min
177

येतो अंधार ढळण्यास

दिव्य प्रकाश घेऊन

कधी सुकाळ नंदन

कधी दुष्काळ न्हाऊन


जन्म रहाट निर्मळ

सुखी दातृत्व मरण

स्वच्छ मन निरक्षर

प्रेम साक्षर चांदण


यश बिलोरी आरसा

अपयश सारीपाट

शील समाज रक्षक

हीन भक्षक ती वाट


देव अंतर्गत काशी

होऊ नकोस दानव

खेळ प्राक्तन सुगंधी

भस्म दुर्गंधी विनाशी


सोड मोह माया स्वार्थ

करा सत्कर्म निस्वार्थ

वाटजरी अवघड

सोपा मार्ग परमार्थ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics