STORYMIRROR

Geeta Ghatge Patil

Classics

3  

Geeta Ghatge Patil

Classics

यंदा

यंदा

1 min
208

मेघुट आभाळ, कृष्ण पापणीत

बरस ना मेघा, तू रे शिवारात ।।१।।

 

 बरसले मेघ, रुपेरी मोत्यांनी

 भिजली धरणी, पिऊनी आकंठ।।२।।


साचले ते जल, खाच खळग्यात

खळाळ जलौघ,फुटेल ती वाट।।३।।


अंकुर फुटेल, तृणकोबांना

शालू हिरवा तो ,लाभेल धरेला।।४।।


आनंदे हसेल, सुखाने पोशिंदा

मायंदाळ पीक, होईल र यंदा ।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics