समरसू दे
समरसू दे
1 min
116
कल्लोळ जपतो,थोडा विसावतो
भटकून जीव फिरून येतो
मला शोधतो ,तू सापडतो
हरवून जाईन ,पकडून ठेव
ना विवंचना,ना घालमेल
मनोअवस्थेचा जमावा मेळ
तुझ्यात मी अन माझ्यात तू
संपावा अस्तित्वाचा खेळ
मिटू दे डोळे मिळू दे शांती
नको भ्रमंती मायाजालात
आकंठ भिजू दे,समरसु दे
निळासावळ्या तुझ्या डोहात
कोण मी ,कोण तू
डोहाच्या तळी जाऊ दे
लख्ख प्रकाश दिसतो तिथे
त्यात मला सामावून घे
