STORYMIRROR

Geeta Ghatge Patil

Inspirational

3  

Geeta Ghatge Patil

Inspirational

चिऊचा आशियाना

चिऊचा आशियाना

1 min
131

तिनं एका कोनाड्यात

वेलीत काड्या कुडयांनी 

पिसांनी सजवलं तिचं घर

त्यावर पडली माझी नजर

 ती उडाली घाबरून दूरवर


 परत ये ग चिऊताई विनवते तुला

 नाही येणार पुन्हा तुम्हाला बघायला 

 तू बिनधास्त कर चिवचिव

 नि बागड तू स्वैर

 मानणार नाही तुझा वावर

 कधी कधीच गैर

 

परत येऊनि विश्वासाने 

 वसव तुझा आशियाना

 चारा खाऊन किलबिल करून

 आम्हा दे सौख्याचा नजराणा


 मी नाही विसरणार

 तुझ्यासाठी पाणी आणि खाऊ ठेवायला 

 पण;

विसरू नको ग अंगणात माझ्या

तू चिवचिवाट करायला ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational