आवाज नसलेलं वृद्धाश्रम
आवाज नसलेलं वृद्धाश्रम
आवाज नसलेलं वृद्धाश्रम
खूप बोलून जात होतं
ह्रदयातील प्रत्येक सल
भावनेतून उतरवत होतं
शांत वाटतं असलं तरी
खूप अशांत ते होतं
कोणत्या गुन्ह्याची मिळतेय शिक्षा
याचा जाब जणू विचारत होतं
आवाज भलेही होत न्हवता
तरी अंतर्गत आक्रोश सुरू होता
ज्यांच्यासाठी आयुष्य वेचल सार
त्यांच खर रूप पाहून तो थक्क होता
व्यथा स्वतःची गिळून टाकून थकलं होत
आवाज नसलेलं ते वृद्धाश्रम
ओझं हलकं करून स्वतःच
मनमोकळं करून खूप रडू पाहतं होत...
