STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

आठवते अजुनी ...

आठवते अजुनी ...

1 min
3.1K


ते मिलनोत्सुक बेधुंद डोळे मज शोधतांना

साधेपणातही सौंदर्य अन् मजसाठी वेडंपीसं होताना.

आठवते तू मला आजही,  अगदी जशीच्या तशी

बोलणे तव मधाळ, रुप देखणे जणुं सोने बावनकशी.

आठवते अजुनी ...

चिंब पावसात भिजतांना अंग अंग शहारायचीस

बेभान मी, मदमस्त तू होवून जायचीस.

मैत्रिणींच्या गराड्यातही तू एकटी पडायचीस

तू असो कुठेही, रात्रंदिनी नेत्री माझ्या असायचीस.

आठवते अजुनी ...

का कुणास ठाऊक? काही तरी शोधायचीस.

उलगडलं न कोडं मला का असं वागायचीस?

बोलतांना माझ्याशी दूर कुठे तरी हरवायचीस

पडता पाऊल पुढं मागून हाक मारायचीस.

आठवते अजुनी ...

बोलण्यास माझ्याशी नेहमीच आतुर असायचीस

वळूनी बघता मागे, तिरपा कटाक्ष टाकून गोड तू हसायचीस...

तर कधी न बोलताही डोळ्यांनींच खूप काही बोलायचीस

गेले ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी.

आठवते अजुनी....

 

 

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance