STORYMIRROR

Sangita Lad

Abstract

3  

Sangita Lad

Abstract

आठवणीतला पाऊस..!

आठवणीतला पाऊस..!

1 min
361

आज पाऊस असा येऊन गेला 

विचारांना एक नवी दिशा देऊन गेला 

मनाला जरा सुगंधित करून गेला

आठवणींना जरा जागृत करून गेला

मागे वळून पाहण्याची इच्छा जरा भरून गेला

मनाला माझ्या मंद असा स्पर्श करून गेला 

आज पाऊस असा येऊन गेला


आज पाऊस असा काही येऊन गेला

डोळे जरा भरून आले

कुणीतरी स्मरून आले

भविष्य माझे हरवून गेले

वर्तमानही विरून गेले

भूतकाळ हा जवळी आला

आज पाऊस असाच काहीसा येऊन गेला...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract