तिला काही सांगायचंय...!
तिला काही सांगायचंय...!
1 min
247
तिला काही सांगायचंय,तिला काही बोलायचंय..
मनामधल्या शेगडीला थोडं मंद केलंय तिने
हृदयातल्या गाभाऱ्याच्या फाटकाला आतून बंद केलंय तिने
तूच जरा समजून घे तिला तिचं हृदय उकलायचंय
तिला काही सांगायचंय तिला काही बोलायचंय..
तिला पोसणार जरी म्हटला जातो तू तरी तूच तिच्या डोक्यावरचा भार आहेस
ती तुझा गुन्हा,अन तूच तिचा गुन्हेगार आहेस
तिला या सर्व बंधनातून मुक्त व्हायचंय
तिला काही सांगायचंय तिला काही बोलायचंय..
