STORYMIRROR

Sangita Lad

Others

4  

Sangita Lad

Others

बालपण परत हवंय..!

बालपण परत हवंय..!

1 min
174

हे परमेश्वरा,

बालपणात माझ्या मला परत एकदा ढुंकून पाहू दे

मनावर लागलेल्या धुळीला परत एकदा फुंकून पाहू दे


वाटलं तर पडू दे हातावर शिक्षेच्या छड्या 

पण परत मारून पाहू दे पावसाच्या पाण्यात उडया


हे ईश्वरा,ते बालपण किती सुंदर होतं

निर्मळ मन होतं, सुंदर तन होतं

एक चॉकलेट सुद्धा खूप मोठं धन होतं


बालपणात तेव्हा एवढं काही कळत नव्हतं

ध्येयासाठी धावपळ करत मन माझं पळत नव्हतं


कमी कुठे पडलो तर जग मला छळत नव्हतं

दुसऱ्यांच्या आनंद पाहून मन हे जळत नव्हतं


परत पावसाच्या पाण्यात मजा मला करू दे

परत पावसाच्या पाण्यात वस्त्र माझे भरू दे


परत बालपणाच्या त्या आठवणींमध्ये झाकून मला पाहू दे

परत त्या चॉकलेटच्या डब्यात वाकून मला पाहू दे


तेव्हा मात्र मोठ्या चुकांची सुद्धा वाटत नव्हती लाज

मात्र लहान सहान गोष्टींसाठी मन निराश होतं आज


मला आईचा पदर परत घट्ट धारायचाय परत माझ्या इच्छांसाठी हट्ट थोडा करायचाय....!


Rate this content
Log in