STORYMIRROR

Sangita Lad

Others

4  

Sangita Lad

Others

सोंग

सोंग

1 min
166

वदली माझीच प्रतिमा व ते नयनकक्ष मोठे

की सुंदर मजसी दाखविणारे ते आरसेही खोटे


मनात अश्रू साचून साचून तर आता डोहही झाले चिंब

लपविले कितीही मी स्वतःला तरी दिसूनच जाते प्रतिबिंब


स्वाभिमानाच्या मृत्यूमुळेच आज माझा चेहरा पडका झालाय

माझ्या आतल्या प्रामाणिकपणाने आज माणूसपणाचा अर्ज दिलाय


माझ्या चेहऱ्यावरच्या भावनांनीच तर हा समाज मज गृहीत धरतो

अन् लोकांच्या मनामध्ये माझी प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठीच तर मी हा मुखवटा धारण करतो


त्रास देतो सतत मला हा प्रवास भांडवणारा

कधी संपणार ईश्वरा आयुष्याचा चित्रपट गंडवणारा


कुणीही उतरवू शकणार नाही ह्याला मी खूप लावलाय कडक पहारा

खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तरी नियती देते मज त्वरित इशारा


श्रीकृष्णाच्या स्मितहास्याचे मी जगास कौतुक दाखवतो

पण परतूनी सदनास माझ्या अखेरी अश्रूंनीच चेहरा माखवतो


राज नेत्यांच्या खुर्च्यांखाली आज ह्यांनी स्वाभिमानाला निजवलंय

अन् काळ्या व्यापाराची पांढरी चादर टाकून माझ्या देशाचं सरण सजवलंय


तसा माझा काही आक्षेप नाही समाजाला खोटा आनंद दाखवायला

पण दुसरे पण मुखवटे आहेतच की खरा चेहरा झाकायला


पण मी आज ठरवलंय की लोकांच्या टीकांच्या प्रदूषणाच्या धुळीला आज मी गाळूनच टाकतो

अन् जिभेवर गोडवा, ओठांवर संतोष आणि डोळ्यात गर्व नसेल तर मी हा मुखवटा जाळूनच टाकतो


आता दुःखाच्या पाण्याने स्वच्छ होवून आनंदाचं तेज गालावर फुलवूयात 

खोटा का होईना पण समाधानाचा मुखवटा चेहऱ्यावर लावूयात....!


Rate this content
Log in