STORYMIRROR

Sangita Lad

Others

4  

Sangita Lad

Others

विद्रोह

विद्रोह

1 min
486

न्यायालयाच्या मूर्तीही झाल्या अन्यायाला पक्क्या 

काय सांगू अन् किती मी मांडू विद्रोहाची व्याख्या।।धृ।।


विनहुंड्याचे मोठ्या मनाचे मुलीस त्रास देऊ करताहेत

जन्म मुलीचा घेऊन पऱ्याही चेहरे झाकून फिरताहेत

आतंक जाहले कमी वाढली आतंक्यांची संख्या

काय सांगू अन् किती मी मांडू विद्रोहाची व्याख्या।।१।।


शेतकरी झाले दंग, भावही मंद, किती मरणार

या मनोमनीचा भास, खोटा आभास कधी सरणार

भिमाचे संविधान जाळले, जाळल्या स्वातंत्र्याच्या बाबी आख्ख्या

काय सांगू अन् किती मी मांडू विद्रोहाची व्याख्या।।२।।


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन